About us
रेशीमगाठी मराठा वधु वर सुचक संस्था, पुणे
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व मराठ्यांची ऐतिहासीक राजधानी असलेल्या सातारा शाहु नगरीत २४ ऑक्टोबर २००४ रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर रेशीमगाठी मराठा वधु वर सुचक संस्थेची स्थापना झाली.
मराठा वधु वरांना आपल्या अपेक्षेप्रमाणे स्थळे मिळावीत व नोंदणी सुलभतेने करता यावी या करीता संस्थेने सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी कार्यालये सुरु केली आहेत. वधु वरांचे विवाह कमीत कमी वेळेत, कमी खर्चात करणेसाठी तसेच मनपसंद अनुरुप व योग्य जोडीदार मिळवुन देणेसाठी संस्था नेहमीच तत्पर असते.
संस्थेच्या वतीने सामाजिक बांधीलकीच्या भावनेने वेगळेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये वधु वरांचे समुदेशन, पालकांचे प्रबोधन, त्याचप्रकारे सातारा, मुंबई, पुणे इथे मेळावे आयोजीत करण्यात येतात.
आज या माहिती तंत्रद्न्यानाच्या युगात संगणकाद्वारे अत्याधुनिक सेवा प्रदान करताना संस्थेस अत्यंत आनंद होत आहे. संस्थेच्या संगणक सेवेचा लाभ घेतल्याबद्दल संस्था आपल्या सर्वांची आभारी आहे. मी संस्थेच्या वतीने आपले स्वागत करतो आणी भावी जोडीदाराच्या आपल्या शोधास हार्दीक शुभेच्छा देतो.
- श्री. सुधाकर देशमुख