नियम
- संस्थेचे सभासद होणे करिता संस्थेकडे आपला फोटो, पत्रिका व संस्थेची फि द्यावी लागेल.
- संस्थेचे सभासदत्व एक वर्षाकरिता राहील. एकावर्षानंतर नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
- एक वर्षाकरिता संस्थेची नोंदणी फि रु.२२००/- आहे. नूतनीकरणासाठी फी रु.२०००/- द्यावे
लागतील.
- नोंदणी फी व नूतनीकरण फी रोखीने, मनीआर्डरने अथवा चेकने स्वीकारली जातील.
- सभासद नोंदणी फी, नूतनीकरण फी पुढील बँक अकॉउंट मध्ये जमा करू शकतात.
बँक :- स्टेट बँक ऑफ इंडिया,
ब्रान्च सातारा,
A/C No. 0032297687143
IFSC- SBIN0001809
अकॉउंट नाव :- प्रतिभा सुधाकर देशमुख
GPay / Phone Pe - 7263981244
- संस्थेकडे एकदा भरलेली फी कोणत्याही कारणाने परत मिळणार नाही.
- सभासदाला नोंदणी क्र. व कार्ड दिले जाते. संस्थेशी व्यवहार करताना सभासदाचे नाव, नोंदणी
क्र. याची माहिती द्यावी, तसेच संस्थेमध्ये येताना नोंदणी कार्ड सोबत आणावे.
- संस्थेच्या वेबसाइटवर स्थळांचे पत्ते व फोननंबर नसतात. अनुरूप असलेल्या स्थळांचा
नोंदणी क्र. ऑफिसमध्ये कळवून त्याची माहिती घ्यावी.
- फोन कार्यालयीन वेळेतच करावा. आपण दिलेल्या फॉर्ममधील फोननंबरवरुनच फोन करावा.
- एका सभासदास फोनवरून एकावेळेस जास्तात जास्त ७ आईडी नंबरचे फोननंबर मिळतील.
- ऑफिस टाईमिंग सकाळी ११.०० ते संध्या. ५.००. मंगळवारी ऑफिस बंद राहील.
- सभासदांना वधुवरांची यादी पाहणेस मिळेल. त्यामध्ये आपल्या अपेक्षेनुसार योग्यतेप्रमाणे
जे स्थळ ह्वे असेल त्याचा नोंद्णी क्रमांक दिले नंतर नोंदणीनुसार संबंधीत स्थळाची माहिती
दिली जाईल.
- माहिती घेतलेल्या स्थळाची नोंद सभासद कार्डमध्ये करणे गरजेचे आहे. तसेच स्थळाची माहिती
घेउन गेल्यानंतर त्या स्थळासंबंधी काय कार्यावाही झाली त्याचा तपशील दिल्यानंतरच पुढील
स्थळाची माहिती मिळेल.
- स्थळाची माहिती घेणेसाठी कार्यालयात येताना दोन व्यक्तिंपेक्षा अधीक व्यक्तिंनी येउ
नये.
- संस्थेकडुन घेतलेल्या स्थळाची माहिती अन्य कोणत्याही त्रयस्थ व्यक्तिस किंवा संस्थेस
देउ नये. तसे निदर्शनास आल्यास सभासदत्व रद्द करण्यात येईल.
- विवाह ठरले नंतर तसे संस्थेस सुचित करणे गरजेचे आहे. त्यानुसार आपली माहिती, फोटो व
कागदपत्रे परत देणे सोईचे होईल.
- वरील प्रमाणे नियम मान्य असतील त्यांनीच या केंद्रात नोंदणी करावी.
|